WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, May 4, 2014

# साधा भोळा#

मी मास्तर साधा भोळा सा-याचा मजवरती डोळा शिजवा भात लावा जाळ भाजीपाला व टाका दाळ कष्ट करा व घाम गाळा सारंयाचा मजवरती डोळा खिचडी सर्वांना वाढा मग सारंयाचे उष्टे काढा कितीही मर्जी तुम्ही पाळा सारंयाचा माझ्यावर डोळा गुण्या गोविंदाने किती नांदा शिक्षण समिती करी वांदा प्रेमाने कितीही सांभाळा सारंयाचा माझ्यावर डोळा सुट्टी असो रविवार कामाचा खूप मजवर भार जिव किती हा करा गोळा सारंयाचा मजवर डोळा अहवालाची वेगळी तयारी कुटूंब सर्व्हेक्षण व जातवारी कामाचा फास नेहमी गळा सारंयाचा मजवरती डोळा

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०