WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, February 28, 2014

विदयार्थ्यासाठी योगासने


विद्यार्थी नियमितपणे करु शकतील अशी सहज सोपी व उपयुक्त अशी योगासने यांत दिली आहे. आपण सर्वाँनी याचा फायदा घ्यावा.

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

शिक्षण सहसंचालिका पुणे सौ. शकुंतला काळे यांनी दिलेला आपल्या वेबसाईट ला अभिप्राय !


शिक्षण सहसंचालिका पुणे सौ. शकुंतला काळे यांनी                             दि. / /२०१४ रोजी आपली वेबसाईट पाहिली त्यांना ती खुप आवडली त्यांनी  खालील शब्दात आपल्या वेबसाईट ला अभिप्राय दिला.
                            दि. / /२०१४
      ध्यास गुणवत्तेचा हि वेबसाईट तयार करून             
 त्याचा वापर करणारे या शाळेतील शिक्षक श्री.संदिप वाघमोरे हे खरोखरच अभिनंद्नास पात्र आहेत. हा नवोपक्रम त्यांनी सुरु केला आहे . 
    या वेबसाईट चा उपयोग इतर शाळांसाठी करावा . स्वतःच्या खर्चाने हा उपक्रम राबविणा-या ध्यास गुणवत्तेचा हि वेबसाईट तयार करून त्याचा वापर करणारे या शाळेतील शिक्षक श्री.संदिप वाघमोरे या उपक्रमशील शिक्षकाचे पुन्हा एकदा अभिनंद्न !!
                                सही
                          सौ. शकुंतला काळे
                    शिक्षण सहसंचालिका MSCRT
                           पुणे .इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Tuesday, February 25, 2014

दुर्मिळ छायाचित्र

कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड अतिशय दुर्मिळ छायाचित्र...महाराष्टाचे शिल्पकार एकत्र एकाच छायाचित्रात......यातील सर्वच माझे आदर्श आहेत. त्यांच्यातील थोडे चांगले गुण घेण आयुष्यात जमल तरी आयुष्याच सार्थक होईल.. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Monday, February 24, 2014

प्रश्नांचे प्रकार


प्रश्नांचे प्रकार १.    मुक्तोत्तरी प्रश्न – या प्रश्नांच्या प्रतिसादाला मर्यादा नसते.विद्यार्थी मुक्तपणे उत्तरे देऊ शकतो.
  उदा. १०० बेरीज येणार्र्या कोणत्याही दोन संख्या लिहा.
 २.   विचारांना चालना देणारे प्रश्न्न:  या विभागात दोन प्रकार आहेत.
१.    सर्जनशीलतेला वाव देणारे प्रश्न : विद्यार्थ्यांना  या प्रकारच्या प्रश्नां मध्ये नावीन्यपुर्ण विचरांना / कृतीला चालना देणारे प्रश्न असतात.
 उदा. मानवाला डोळे नसते तर काय झाले अ‍सते ?
       गोष्ट पुर्ण करा.

२.चिकित्सक विचारांना वाव देणारे प्रश्न : चिकित्सक प्रतिसादाची अ‍पेक्षा असते .
उदा. पाऊस पडला नाही तर त्याचे काय परिणाम होतील ?
३ उपायोजनात्मक प्रश्न :ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येईल असे प्रश्न
उदा. वाक्यात उपयोग करा.
        मला आशा आहे की , हा लेख आपल्याला प्रश्नपत्रिका निर्मिती
 करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल,                    
                        - श्री. संदिप बलभीम वाघमोरे
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

प्रश्नांचा प्रकारानुसार भारांश         प्रश्नांचा प्रकारानुसार भारांश


इयत्ता
वस्तुनिष्ठ
लघुत्तरी
दिर्घोत्तरी
पहिली –दुसरी
७०%
३०%
-
तिसरी – चौथी
४०%
५०%
१०%
पाचवी ते आठवी
२०%
६०%
२०%

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

प्रश्नपत्रिका निर्मितीप्रश्नपत्रिका निर्मितीशिक्षक मित्रांनो चांगले प्रश्ननिर्मिती हि एक कला आहे. प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी आपल्या कडे विषय निहाय प्रश्नपेढी अ‍सणे आवश्यक आहे.याचा उपयोग सराव व मूल्यमापन तंत्रासाठीदेखील होऊ शकतो.


प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी प्रश्नांचा भारांश माहीत अ‍सणे गरजेचे आहे.

माहिती साठी खाली  क्लिक करा
   

♦ प्रश्नांचा प्रकारानुसार भारांश

   प्रश्नांचे प्रकार

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

नवोपक्रम करण-या शिक्षकाची ग़ुणवैशिष्ट्ये


नवोपक्रम करण-या शिक्षकाची ग़ुणवैशिष्ट्ये

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Sunday, February 23, 2014

वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश


वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश घेणारे मुल व त्याची इयत्ता

वय         इयत्ता

६+                पहिली     
७+           दुसरी
८+           तिसरी
९+           चौथी
१०+          पाचवी
११+          सहावी
१२+          सातवी
१३+          आठवी 

- श्री. संदिप बलभीम वाघमोरे 

         

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

पर्यावरण विषयक शिक्षकाने राबबिण्याचे उपक्रम

पर्यावरण विषयक शिक्षकाने राबबिण्याचे उपक्रम
१.निसर्गवर्णनपर  कवितांचा संग्रह
२.वर्गखोलीत पर्यावरण जाणिव जागृती कोपरा बनवणे
३.विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्याचे आव्हाहन करावे.
४. पर्यावरण विषयक गटचर्चा ,व्याख्याने , कृतिसत्रे आयोजित करून सहभागी होणे.
५. पर्यावरण विषयक ऐतिहासिक उतारा संग्रह
६. आकशदर्शन, पक्षी निरिक्षण आयोजित करणे
७.प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कागदी पिशव्यांची निर्मिती करणे.
८. पर्यावरण विषयक चित्र संग्रह
९.पर्यावरण विषयक चित्रकला रांगोळी व निबंध स्पर्धा घेणे.
१०. रोजच्या परिपाठात पर्यावरण विषयक मह्त्त्व सांगणारे सुविचार , बोधकथा , अभंग ओव्या यांचा समावेश करावा.

सौ.अश्विनी संदिप वाघमोरे,सावळकर
जि.प.प्राथमिक शाळा कोह्राळे बु
ता. बारामती जि. पुणे 


इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

पुणे जिल्हा ऐतिहासिक ठिकाणे


सिंहगड

सिंहगड
Sinhagadmore.jpg
सिंहगड
नावसिंहगड
उंची४४००मी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणपुणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गावसिंहगड
डोंगररांगभुलेश्वर
 
       सिंहगड :- पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले " गड आला पण सिंह गेला" त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.


आगाखान पॅलेस

.
गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.     
शनिवारवाडा

पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.


  पर्वती


हे पुण्याचे स्थान दर्शविणारे प्रसिध्द ठिकाण आहे. पर्वतीची टेकडी ही जरी शहराच्या दक्षिणेकडील भागात असली तरी सुध्दा ती शहराच्या जवळजवळ सर्वच भागातून दिसू शकते. मंदिराला 8 पाय-या आहेत ज्या पार्वती व देवडेश्वरांना अर्पण केलेल्या आहेत. तेथे विष्णु, गणेश व कार्तिकस्वामी यांचेही मंदिर आहे. टेकडीच्या माथ्यापर्यंत चढून गेल्यावर आपल्याला सर्व बाजूने पुणे शहराचे सुंदर दर्शन घडल्याचा आनंद लुटता येतो.


        

राजगड किल्लाराजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85कि.मी. अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा खास किल्ला होता तसेच तो त्यांची पहिली राजधानी सुध्दा होता. त्यामुळे या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक प्रसंगोचितता आहे. राजगडाला फसवा प्रवेश, नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे. प्रचंड पाली गेट, नेध किंवा एलिफन्ट आईज अजूनही आहेत. राजगडाच्या माथ्यावरुन सहयाद्रीच्या रांगांचे भव्य दर्शन होते


.


राजगड
Pali Darwaza Rajgad.jpg
पाली दरवाजा, राजगड किल्ला
नावराजगड
उंची१३९४मी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणपुणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गावकर्जतपाली
डोंगररांगपुणेतोरणा
Torna entrance.jpg
तोरणा किल्ल्याचा मुख्य दरवाजा
नावतोरणा
उंची१४०३ मीटर/४६०४ फूट.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणपुणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गाववेल्हा
डोंगररांगपुणे
सध्याची अवस्थाचांगली

तोरणा किल्ला


हा किल्ला पुण्यापासून 65कि.मी.दूर वेल्हा येथे वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे.
पुरंदर  किल्ला


हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पुरंदर
Purandar Fort entrance 2.jpg
किल्ले पुरंदर
नावपुरंदर
उंची१५०० मी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणपुणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गावसासवड
डोंगररांगपुणे
सध्याची अवस्था
स्थापना{{{स्थापना}}}
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावूनभुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. संभाजी महाराज समाधी

धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी पुणे_नगर महामार्गावरील वडु-बुद्रुक येथे आहे.ते कोरेगाव पासून 3-4 कि.मी.अंतरावर भिमा नदीच्या काठी आहे.Shambhuraje1.jpg

संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल
सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०