
Saturday, May 3, 2014
कथा नोबेलची
दर वर्षी अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी- म्हणजेच 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अगदी राजेशाही थाटात नोबेल पुरस्कार प्रदान करण्यातश येतात. या पुरस्काराची प्रक्रिया, हा पुरस्कार का दिला जातो त्याबद्दलचा हा सकाळ साप्ताहिकमध्ये प्रकाशित झालेला लेख...
दर वर्षी अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी- म्हणजेच 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अगदी राजेशाही थाटात नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, साहित्य, वैद्यकशास्त्र व शांतता या क्षेत्रांत अलौकिक काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे कौतुक म्हणून व त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून दिला जाणारा नोबेल पुरस्कार हा आज जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.
आंतरराष्ट्रीय मान व प्रतिष्ठा लाभलेल्या या पुरस्कारामागे जवळपास एकशेपाच वर्षांचा इतिहास आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युपत्राप्रम ाणे चार पुरस्कार स्टॉकहोम येथे दिले जातात व जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा शांतता पुरस्कार हा ऑस्लोमध्ये देण्यात येतो.
शांतता पुरस्कार देण्यासाठी वेगळी जागा राखून तो नोबेलसाठी कसा महत्त्वाचा आहे, हे त्यानी जगाला दाखवून दिले आहे.
अल्फ्रेड नोबेल यांनी खाणींची जमीन खोदण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा डायनामाईटचा शोध लावला; पण प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर युद्धात एक संहारक अस्त्र म्हणून वापर करण्यात आला. डायनामाईटचा युद्धात वापर करण्यात येत आहे, हे कळल्यावर नोबेलला चांगलाच धक्का बसला. आपल्या या शोधाचा असा गैरवापर होत आहे, हे बघून त्याला फार खेद झाला. त्याने समाजाची माफी मागण्यासाठी नोबेल फाउंडेशनची स्थापना करून त्याला आपल्या अमाप संपत्तीतला मोठा हिस्सा बहाल केला.
सर्वसामान्य जनतेला अल्फ्रेड नोबेल व नोबेल पारितोषिकाबद्दल एवढीच माहिती आहे; पण स्टॉकहोममधील नोबेल सेंटर बघण्यासाठी गेले तेव्हा तेथील गाइडकडून आणखीही काही गोष्टी कळल्या. त्याने सांगितले, की नोबेलचे वडील दारूगोळा तयार करण्याच्या व्यवसायात होते व ते बघत बघतच नोबेल लहानाचा मोठा झाला. ही पार्श्वभूमी बघता, डायनामाईट युद्धासाठी वापरले गेले त्याचा धक्का नोबेलला बसायचे काहीच कारण नव्हते.
दुसरी एक कहाणी म्हणजे नोबेलचा भाऊ लुडविक आपल्या कारखान्यात संशोधन कार्यात मग्न असताना अचानक तिथे बॉम्बस्फोट झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी लुडविकऐवजी चुकून अल्फ्रेड नोबेलचा मृत्यू झाल्याची बातमी छापली. ती बातमी वाचून स्वीडनमधील लोकांना अतिशय आनंद झाला व त्यांनी"अनेक माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ही खचितच खुशीची गोष्ट आहे'अशा आशयाच्या घोषणा दिल्या. आपल्या मृत्यूचा लोकांना एवढा आनंद झाला, हे बघून नोबेलच्या मनाची काय अवस्था झाली असेल, हे आपण समजू शकतो.
या घटनेनंतर आपण समाजाचे अपराधी आहोत व त्याची आपण कोणत्याही परिस्थितीत भरपाई केली पाहिजे, या विचाराने नोबेलला ग्रासले. त्याच भावनेतून त्याने नोबेल पारितोषिकांची घोषणा केली. नोबेल निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून त्याच्यावर मिळणाऱ्या उत्पन्नातून ही पारितोषिके द्यावीत, असे त्याने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले.
त्यानुसार अल्फ्रेड नोबेलच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजे 10 डिसेंबर 1901 पासून नोबेल पारितोषिके देण्यास प्रारंभ झाला. 1969 पासून नोबेलच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बॅंकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरवात केली.
नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड
ऑक्टोबर महिना उजाडला, की लोकांचे लक्ष स्टॉकहोमकडे लागलेले असते. कारण ऑक्टोबरमधील वेगवेगळ्या दिवशी त्या वर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावाची घोषणा होणार असते. दर वर्षी नोबेल पुरस्कारांसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामांकने येतात. त्या त्या वर्षीची नामांकने पाठवायची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी असते. त्यानंतर नोबेल समित्या खऱ्या अर्थाने कार्यरत होतात. नामांकनानुसार व्यक्ती व संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्यानुसार अहवाल तयार केला जातो. हा अहवाल व समित्यांच्या शिफारशी पारितोषिक देणाऱ्या संस्थांकडे पाठवल्या जातात.
नोबेलच्या मृत्युपत्राप्रम ाणे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यातील पारितोषिके देण्याचा अधिकार रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेसकडे, वैद्यकशास्त्राच े पारितोषिक देण्याचा अधिकार रॉयल कॅरोलिन सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे व साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार स्वीडिश ऍकॅडमीकडे असतो. नॉर्वेजियन नोबेल कमिटीकडे शांतता पुरस्कार देण्याचे अधिकार असतात. पारितोषिकासंबंध ीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती असते व जरूर वाटल्यास इतर तज्ज्ञांची मदत घेतली जाते. तिथे बहुमतांनी सन्मान्य निवडला जातो व मतदान झाल्यावर लगेचच त्याचे नाव जाहीर करण्यात येते. या सर्व कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळण्यात येते. एका ऍवॉर्डसाठी जास्तीत जास्त तीन व्यक्तींची निवड करण्यात येते. अंतिम निर्णयाविरुद्ध दाद मागता येत नाही.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा