फुटबॉल
![]()
आक्रमक खेळाडू (क्र.१०) गोल करण्याच्या प्रयत्नात
| |
सर्वोच्चसंघटना | फिफा |
---|---|
उपनाव | असोशिएशन फुटबॉल, सॉकर, फुटी, "द ब्युटीफुल गेम", "द वर्ल्ड गेम" |
सुरवात | मध्य १९ वे शतक ब्रिटन |
माहिती | |
कॉन्टॅक्ट | हो |
संघ सदस्य | ११ खेळाडू संघागणिक |
मिश्र | हो, स्वतंत्र स्पर्धा |
वर्गीकरण | सांघिक खेळ, चेंडू खेळ |
साधन | फुटबॉल |
मैदान | फुटबॉल मैदान |
ऑलिंपिक | इ.स. १९०० |
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
२१ मे १९०४ रोजी पॅरीस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धाफुटबॉल विश्वचषक होय.
१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७० च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.

खेळाचे स्वरूप
हा खेळ एका गोलाकृती चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतर होतो.
महत्त्वाच्या संघटना[संपादन]
- फिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन
- युएफा : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा