
Saturday, June 28, 2014
सोपे रूप
सोपे रूप देताना खालील नियम दिलेल्या क्रमानेच लक्षात ठेवा.
I. कंसात दिलेली क्रिया प्रथम करावी.
II. नंतर राशीमध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतील, तर आधी गुणाकार आणि भागाकार या क्रिया असल्यास त्या डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने कराव्या.
III. नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया, डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील, त्या क्रमाने कराव्या.
IV. कंसात एकापेक्षा अधिक क्रिया असतील, तर वरील दोन नियम पाळून त्या आधी कराव्या.
V.एकापेक्षा जास्त प्रकाराचे कंस वापरले असतील, तर प्रथम सर्वात आतील कंसातील क्रिया कराव्या.
ह्या नियमाला थोडक्यात कंचे-गुभा-बेव किंवा इंग्रजीत BODMAS म्हणता येईल. म्हणजे आधी कंस सोडवा. जर एकापेक्षा जास्त कंस असतील तर आतून बाहेर कंस सोडवा.
नंतर I. गुणाकार-भागाकार II. बेरीज-वजाबाकी अशा क्रमाने सोडवा. फक्त एक बाब ह्या जोड्यांमधील क्रिया डावीकडून उजवीकडे सोडवा.
म्हणजे आधी गुणाकार आणि नंतर भागाकार असे नाही तर डावीकडून उजवीकडे गुणाकार किंवा भागाकार पैकी आधी जे येईल ते नंतर दुसरे.हाच नियम अशाच प्रकारे बेरीज-वजाबाकी ह्या जोडीला वापरला जातो. पण गुणाकार-भागाकार आधी नंतर बेरीज-वजाबाकी.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा