आपण जसजसे मोठे होत जातो, शरिराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्त वाहिन्यांमध्ये आतून कोलेस्ट्रॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो.रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीनेचिंचोळ्याहोण्यालाअथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकारजास्त प्रमाणात आढळतो.सामान्यत:महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत.ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो.
भारतीयांसहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो.
ज्यात खालील कारणांचा समावेश आहे:
*.धूम्रपान करणे
*.मधूमेह
*.उच्च रक्तदाब
*.लठ्ठपणा
*.उच्च कोलेस्ट्रॉल,आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
*.शारिरीक श्रमाची कमतरता
*.अनुवंशिकता
*.तणाव,रागीटपणा आणि चिंता
*.वंशानुगत मुद्दे
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा