WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Tuesday, January 14, 2014

माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय?

माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. यामध्येरेडियो,दूरदर्शन,व्हिडियो,डिव्हिडी,दूरध्वनी,मोबाईलफोन,उपग्रहावरआधारीतसेवावसुविधा,संगणकवत्या संबंधितहार्डवेअरआणिसॉफ्टवेअरअशा गोष्टींचा समावेश होतो. ह्या व्यतिरिक्त,व्हिडियोकॉन्फरन्सिंग,ईमेल,ब्लॉगअशा तंत्रांचा ही यात समावेश होतो. सध्याच्या ‘माहिती युगात’ शैक्षणिक ध्येये समजून घेण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या (ICT) नवनवीन स्वरूपांचा शिक्षणात अंतर्भाव करणे गरजेचे आहे. हे सर्व प्रभावीरीत्या करण्यासाठी शैक्षणिक नियोजनकार, मुख्याध्यापक, शिक्षक व तंत्रज्ञांना प्रशिक्षण, तंत्रज्ञान, वित्त, शिक्षण, संप्रेषण अशा विविध क्षेत्रात अनेक निर्णय, ते ही योग्य रीत्या घेता आले पाहिजेत. अनेकांसाठी हे काम म्हणजे एखादी नवी भाषा शिकणे व ती शिकविण्यास शिकणे इतके कठीण काम वाटते. या विभागात विविध उपकरणे व तंत्रे यांची माहिती दिलेली आहे. यात देशांना जोडणार्या उपग्रहांपासून, विद्यार्थी वर्गात वापरत असणार्या उपकरणांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. शिक्षणतज्ञ, नीतीशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभ्यासक्रम तयार करणारे तज्ञ तसेच इतरांना माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची (ICT) गुंतागुंतीची उपकरणे, त्या संबंधित संज्ञा आदींतून मार्ग काढत योग्य निर्णय घेणे सोपे जावे हा यामागील उद्देश आहे. इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasgunvattecha.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०