आम्ही मुले लहान घडवू देश महान

घडवू देश महान …
भेदभाव हे विसरुनी जाऊ, सर्व हो एकसमान …
भारत-भू ची आम्ही सोनुले घेऊ एकच आण,
देशासाठी आम्ही वेचू आमुचे प्राण !
आम्ही मुले लहान … हो … हो …
घडवू देश महान …
परिश्रमाची शर्थ करुनी, प्रगत करू विज्ञान,
ज्ञानाची हि कांस धरुनी, चढवू उंच कमान,
वृक्ष वेलींचे रक्षण करुनी, वाढवू आम्ही शान,
संस्कृतीचे जतन करुनी, जगात मिळवू मान !
आम्ही मुले लहान … हो … हो …
घडवू देश महान …
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा