आज इयत्ता 3 री चा परिसर अभ्यासाचा तास .सर्व विद्यार्थी पाठ्यपुस्तक काढून पाठ क्र.४ दिशा आणि नकाशा उघडून त्यातील चित्र निरिक्षण व चर्चा करत होते.चर्चा सदर विषयाचिच असेल असही नाही. मी हाजरी घेतली व विद्यार्थ्यांना विचारले काय करायचे आता? प्रत्येकाने पुस्तकातील चित्रे मला दाखवून असेही आपण करू असे त्यांना सुचवायचे होते. मुळात मीही चित्रे पाहिली नव्हती .असो .पटकन पुस्तक हातात घेतली व माला एक साधी कल्पना सुचली .शाळेत माउंट पेपर पासून बनविलेल्या जुन्या टोप्या होत्या.मुख्याध् यापकान्ना मार्कर पेन मागितले व त्यावरच मुख्य दिशांची नावे वेळेवर लिहली व मुलांच्या डोक्यावर त्या लावून दिल्या.मुलांना बाहेर काढून मग झाला आमचा दिशांचा खेळ सुरू.
मुख्य दिशा कोणत्या? सूर्य उगवण्याची दिशा कोणती? सूर्य मावळतिची दिशा कोणती? पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडची ,उजवीकडची दिशा कोणती ? या व अश्या खुप प्रश्नांची उत्तरे मुलांनीच एकमेकांना विचारून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातु न माहित करून घेतली . मी मात्र बघ्यांच्या भूमिकेत केवळ मार्गदर्शक म्हणून ! सॉरी मार्गदर्शक नाही"सुलभक"म्हणून.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा