
Wednesday, August 6, 2014
एक उपक्रम छोटासा
आज शेवटची तासिका शा.शिक्षणाची .मुले मागे लागली की काहीतरी खेळ खेळूया ! काय खेळ घ्यावा बरं? मैदान तर पावसानं ओलं झालेले त्यामुळे मोठे खेळ खेळताच येत नव्हते.
माझाही मुड आज चांगलाच होता .थोडा विचार केला आणि एक लघु क्षेत्रीय खेळ सुचला'नागमोडी धावणे'.मैदान ओलं असल्याने लहान क्षेत्रात तो उत्तम जमणार होता.काडीने नागमोडी ट्रैक तयार केला व झाला आमचा खेळ सुरु.कधी नागमोडी धावणे तर कधी लंगड़ी धरून जोरात त्या ट्रैक वर धावणे .सोबत आमचे मुख्याध्यापक श्री.चिचघरे सर होतेच.त्यांनीही तेथे स्पर्धा घेतली जो रेषेबाहेर न जाता कमी वेळात track पार करेल तो विजेता.
यामुळे कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढता क्षेत्रांतर्गत विविध खेळ या घटकान्तर्गत'संतुलन'या बाबींचा सराव झाला असे म्हणावयास कही हरकत नाही कारण सर्व मुलांसोबतच आम्ही पण हा खेळ एन्जॉय केला बस!
Sudhir Moharkar
जि.प.प्राथ.शाळा,
केळझ-र
ता.मूल
जि.चंद्रपुर
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
Saturday, August 2, 2014
Sudhir Moharkar Upakram
आज इयत्ता 3 री चा परिसर अभ्यासाचा तास .सर्व विद्यार्थी पाठ्यपुस्तक काढून पाठ क्र.४ दिशा आणि नकाशा उघडून त्यातील चित्र निरिक्षण व चर्चा करत होते.चर्चा सदर विषयाचिच असेल असही नाही. मी हाजरी घेतली व विद्यार्थ्यांना विचारले काय करायचे आता? प्रत्येकाने पुस्तकातील चित्रे मला दाखवून असेही आपण करू असे त्यांना सुचवायचे होते. मुळात मीही चित्रे पाहिली नव्हती .असो .पटकन पुस्तक हातात घेतली व माला एक साधी कल्पना सुचली .शाळेत माउंट पेपर पासून बनविलेल्या जुन्या टोप्या होत्या.मुख्याध् यापकान्ना मार्कर पेन मागितले व त्यावरच मुख्य दिशांची नावे वेळेवर लिहली व मुलांच्या डोक्यावर त्या लावून दिल्या.मुलांना बाहेर काढून मग झाला आमचा दिशांचा खेळ सुरू.
मुख्य दिशा कोणत्या? सूर्य उगवण्याची दिशा कोणती? सूर्य मावळतिची दिशा कोणती? पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडची ,उजवीकडची दिशा कोणती ? या व अश्या खुप प्रश्नांची उत्तरे मुलांनीच एकमेकांना विचारून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातु न माहित करून घेतली . मी मात्र बघ्यांच्या भूमिकेत केवळ मार्गदर्शक म्हणून ! सॉरी मार्गदर्शक नाही"सुलभक"म्हणून.

इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

Subscribe to:
Posts (Atom)