WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Friday, June 13, 2014

प्रेमळ पत्नीसाठी दोन शब्द..

°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°° °°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°° °°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°👪 °°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°° °°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°⌚ °°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°° °°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°° °°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°° °°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°😀 °°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°° °°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°° °°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°° °°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°° °°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°° °°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°° °°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°° °°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°° °°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°° °°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°° °°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°° °°°अशी काहीशी साथ दे°°° °°°मित्रत्वाचा हात दे°°° ही कविता नक्की शेअर करा
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०