सिंहगड
सिंहगड | |
![]() सिंहगड | |
नाव | सिंहगड |
उंची | ४४००मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सिंहगड |
डोंगररांग | भुलेश्वर |
सिंहगड :- पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले " गड आला पण सिंह गेला" त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
आगाखान पॅलेस
.

शनिवारवाडा

पर्वती

राजगड किल्ला
राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85कि.मी. अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा खास किल्ला होता तसेच तो त्यांची पहिली राजधानी सुध्दा होता. त्यामुळे या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक प्रसंगोचितता आहे. राजगडाला फसवा प्रवेश, नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे. प्रचंड पाली गेट, नेध किंवा एलिफन्ट आईज अजूनही आहेत. राजगडाच्या माथ्यावरुन सहयाद्रीच्या रांगांचे भव्य दर्शन होते
.
राजगड | |
![]() पाली दरवाजा, राजगड किल्ला | |
नाव | राजगड |
उंची | १३९४मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | कर्जत, पाली |
डोंगररांग | पुणे |
तोरणा | |
![]() तोरणा किल्ल्याचा मुख्य दरवाजा | |
नाव | तोरणा |
उंची | १४०३ मीटर/४६०४ फूट. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | वेल्हा |
डोंगररांग | पुणे |
सध्याची अवस्था | चांगली |
तोरणा किल्ला
हा किल्ला पुण्यापासून 65कि.मी.दूर वेल्हा येथे वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे.
पुरंदर किल्ला
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पुरंदर | |
![]() किल्ले पुरंदर | |
नाव | पुरंदर |
उंची | १५०० मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सासवड |
डोंगररांग | पुणे |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावूनभुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
संभाजी महाराज समाधी
धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी पुणे_नगर महामार्गावरील वडु-बुद्रुक येथे आहे.ते कोरेगाव पासून 3-4 कि.मी.अंतरावर भिमा नदीच्या काठी आहे.

No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा