WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.

Sunday, January 5, 2014

वीस पटाच्या आतील शाळा जूनपासून बंद

राज्यात वीस पटाच्या आतील शाळा जून २0१४ या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार आहेत. वाहतूक अनुदान देऊन या शाळांतील विद्यार्थ्यांचे दुसर्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन करणे शक्य नाही, केवळ अशा शाळा सुरू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा लागेल. प्रतिवर्षी ३0 सप्टेंबरअखेर युडाससमध्ये संकलित केली जाणारी विद्यार्थी संख्या शिक्षक निश्चितीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. चालू वर्षीच आरटीईनुसार शिक्षक निश्चिती करण्यात येणार असून ३१ डिसेंबरपूर्वी कमी-जास्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कळवले आहे. अतिरिक्त होणार्या शिक्षकांचे अनुक्रमे जिल्हा विभाग व राज्यांतर्गत समायोजन करावे, असे सुधारित आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच् या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने १३ डिसेंबर रोजी नव्याने आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांत २0 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजित केले जाणार आहे. नजीक शाळा नसेल तर अशा विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान देऊन दुसर्या शाळेत समायोजन करण्याचे कळवले आहे. चालू शैक्षणिक वर्षात आरटीईनुसार शिक्षक निश्चिती व्हायची. आता विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक पदांना मंजुरी दिली जाणार आहे. कनिष्ठ प्राथमिक शाळा (इ. पहिली ते पाचवी) करिता तीस विद्यार्थी संख्येमागे एक शिक्षक, तर वरिष्ठ प्राथमिक शाळा (इ. ६ वी ते ८ वी) करिता ३५ विद्यार्थ्यांकर िता १ शिक्षक राहणार आहे. दरवर्षी ३0 सप्टेंबरअखेर एकीकृत जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीमध्ये संकलित केली जाणारी विद्यार्थी संख्याच शिक्षक निश्चितीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा

सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.
वेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे
  • मो.९८८१५४९३४०