अक्षयत्रितीया : - आकीदी .... ....युगादी.....
एक संकलन ……..
· अक्षय = अमर , क्षय न होणारा . त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.
· त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .
· परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )
· पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.
· श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ. केला.
· भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण. स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.
· श्री बसवेश्वर जयंती .
· श्री आद्य शंकराचार्य जयंती.
· श्री नरनारायण अवतार.
· श्री हयग्रीव अवतार.
· या दिवसा पासून श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.
· याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, अशी आख्याईका सांगतात की श्री लक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर ) कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाद्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केले तो हाच दिवस. या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.
· म्हणून हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्ष्मीची पूजा करून पुरणावरणाचा नैवैद्य दाखवितात.
· दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .
· पुण्य गोळा करण्याचा दिवस.
· भूतकाळ विसरण्याचा दिवस.
· सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.
· वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.
सर्वांना अक्षय तृत्तीयेसाठी हर्दिक शुभेच्छा !!! ....... .......
🌺💐 राम कृष्ण हरी 💐🌺
🙏🙏सुप्रभात 🙏🙏
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा