हॉकी
हॉकी सामना
| |
सर्वोच्च संघटना | आतंरराष्ट्रीय हॉकी संघटन |
---|---|
सुरवात | १९ वे शतक |
माहिती | |
कॉन्टॅक्ट | नाही |
संघ सदस्य | ११ खेळाडू मैदानात |
वर्गीकरण | इंडोर - आउटडोअर |
साधन | हॉकी चेंडू,हॉकी स्टीक |
ऑलिंपिक | १९०८,१९२०,१९२८-सद्य |
हॉकी, किंवा फिल्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरूध्द संघाच्या गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे मान्यता प्राप्त नाव हॉकी असले तरी ज्या देशा हॉ़की नाव इतर हॉकी प्रकारांसाठी उदा. आइस हॉकी, वापरल्याजाते त्या देशात ह्या खेळाला फिल्ड हॉकी म्हणले जाते.
हॉकी मध्ये पुरूष व महिलांसाठी अनेक नियमीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. महत्वाच्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक स्पर्धेंचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) हि खेळाची सर्वोच्च संघटना आहे. एफ आय एच हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावळी ठरवते.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेट नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ इंडोर खेळल्या जातो. इंडोर फिल्ड हॉकी चे नियम हॉकी पेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात ६ खेळाडू असतात नियमीत ११ एवेजी, मैदान सहसा ४० मी x २० मी; [मराठी शब्द सुचवा]शूटींग सर्कल ९मी. बाजूच्या सीमा एवेजी [मराठी शब्द सुचवा]बॅरीयर्स असतात. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.
इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...
No comments:
Post a Comment
आपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा